Homeकोकण-महाराष्ट्रदिवा स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको

दिवा स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको

कळंबोली येथे मालगाडी रुळावरून हटविण्यास उशीर झाल्याने प्रवाशांचा संताप,रेल्वे सेवा विस्कळीत

दिवा:-कळंबोली येथे मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. दिवास्थानकात मंगळूर एक्सप्रेस जवळपास दहा तासापासून थांबल्याने संतप्त प्रवाशांनी अखेर रविवारी सकाळी रेल रोको केला यामुळे लोकल सेवा ही विस्कळीत झाली.

कळंबोली मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक बाधित झाली. मालगाडी रुळावरून हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू असताना दहा तासाहून अधिक वेळ झाला तरी रेल्वे वाहतूक सुरळीत होत नसल्याने कोकण रेल्वे व मध्य रेल्वेची कोकणच्या दिशेने जाणारी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.गणपती विशेष ट्रेन देखील यामुळे बाधित झाल्या. रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून पुणे मार्गे ट्रेन सोडण्यास सिग्नल दिला मात्र प्रवाशांनी पनवेल मार्गेच प्रवास करण्याचा आग्रह धरला.रेल्वे प्रशासनाने मालगाडी हटवण्यास विलंब केल्याने अखेर प्रवाशांचा उद्रेक होऊन प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको करत संताप व्यक्त केला. यामुळे रेल्वेची लोकल सेवा ही विस्कळीत झाली.

error: Content is protected !!