ठाणे महानगरपालिकेने दिव्यात स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घ्यायला हवी!
दिवा:-राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई, ठाण्यात डीप क्लीनिंगचा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असताना, दिव्यात मात्र ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचा बोजवारा उडवला जात आहे. दिवा शहरात स्वच्छतेच्या नावाने बोंब असून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही.अंतर्गत रस्त्यांना गल्लीबोळात अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसतो. मुख्य रस्ते देखील स्वच्छ नसतात.महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा घालून दिलेला आदर्श दिव्यात राबवण्याचा प्रयत्न करावा.दिवा शहर अस्वच्छतेपासून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांची आहे. मात्र दिव्यातील प्रश्नांकडे सहजतेने लक्ष देईल ती ठाणे महापालिका कसली? अशी भावना येथील नागरिकांची आहे!






