Homeठाणे-मेट्रोव्हेल माशाची उलटीसह एकाला अटक ; अंदाजे ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

व्हेल माशाची उलटीसह एकाला अटक ; अंदाजे ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाणे: आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या व्हेल माशाची वांती/ उलटी (Ambergris) घेवून विक्री करीता आलेल्या पुण्यातील नितीन मुत्तना मोरेलु याला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ०५ किलो ४८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली असून त्याची अंदाजे किंमत ५ कोटी रूपये असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी तथा वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.
राबोडी, साकेत कॉम्प्लेक्स कडुन क्रिक नाक्याकडे येणाऱ्या रोड येथे एक जण व्हेल माशाची उलटी विक्री करीता येणार असल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखा १ चे पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून नितीन मोरेलू याला सोमवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली. याच्या ताब्यातून ०५ किलो ४८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटीचे लहान-मोठे आकाराचे लाल रंगाचे तुकडे हस्तगत करण्यात आले. तसेच चौकशीत त्या व्हेल माशाच्या उलटीस आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात चांगली मागणी आहे. त्या उलटीचा उच्च दर्जाचे अत्तर, सुगंधित द्रव्ये तयार करण्यासाठी वापर केला जातो. त्याची अंदाजे किंमत ५ कोटी रूपये आहे.तसेच त्याने ती उलटी कोणाकडुन व कोणास विक्री करीता आणली याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९बी, ५७, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे शहर गुन्हे शाखा १ च्या पथकामार्फत सुरू आहे.

error: Content is protected !!