ठाणे:- दिवा, दातिवली स्मशानभूमी जवळील सिताराम नगर येथील तळ अधिक ०४ मजली लक्ष्मी निवास या रिकाम्या इमारतीच्या छतावरील लोखंडी पत्र्याची शेड तुटून लटकत होती.ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, लटकत असलेली पत्र्याची लोखंडी शेड बाजूला केली असून घटनास्थळाचा धोका दूर केला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.