Homeठाणे-मेट्रोएसीच्या युनिटला आग; चौघे बचावले

एसीच्या युनिटला आग; चौघे बचावले

ठाणे:- नौपाडा परिसरातील सत्य सोसायटी, इ- विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक – ८ मध्ये एसीच्या इनडोअर युनिटला आग लागली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून ५ मिनिटांनी समोर आली. आग लागली तेंव्हा घरामध्ये चार जण होते. ते सुरक्षित बाहेर पडल्याने बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत, त्या आगीवर जवळपास ४० मिनिटांनी नियंत्रण मिळवण्यात यश आले. सदर रूम राजेश राणे यांच्या मालकीची असून ती रूम त्यांनी कृष्णा मिश्रा यांना भाड्याने दिली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!