Homeठाणे-मेट्रो'हिरानंदानी इस्टेट'चे केले दोन प्रभागांमध्ये विभाजन!

‘हिरानंदानी इस्टेट’चे केले दोन प्रभागांमध्ये विभाजन!

माजी गटनेते मनोहर डुंबरे यांचा आक्षेप

ठाणे :- महापालिकेच्या प्रभाग रचनेत `हिरानंदानी इस्टेट’चे दोन प्रभागांमध्ये विभाजन केले असून, `हिरानंदानी रोडाज’मधील १८ इमारती प्रभाग क्रमांक १ मध्ये, तर उर्वरित ११६ इमारती प्रभाग क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या रचनेविरोधात भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेच्या २०१७ मधील प्रभाग रचनेतही हिरानंदानी रोडाज संकुलातील इमारती प्रभाग क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या संकुलातील रहिवाशांची मतदान केंद्रे दोन ते तीन किलोमीटरवर होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली होती. भौगोलिकदृष्ट्या या इमारती हिरानंदानी संकुलाबरोबर जोडल्या गेल्या आहेत. या प्रभागातील नागरी सुविधांची कामे एकत्रितरित्या होण्यासाठी संपूर्ण हिरानंदानी संकुलाचा समावेश प्रभाग क्र. २ मध्ये करावा, अशी मागणी माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. याबाबत नागरिकांच्या वतीनेही हरकत दाखल केली जाणार आहे.

error: Content is protected !!