Homeठाणे-मेट्रोदोन वर्षात वास्तूंची दुरावस्था झाल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची काँग्रेसची मागणी

दोन वर्षात वास्तूंची दुरावस्था झाल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे:- कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे कामकाज याबाबत काँग्रेसने उघड करून याबाबत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून दूरवस्था झालेल्या वास्तूंची दुरुती कारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांचे दोषदायित्व कालावधी संपले असले तरी कंत्राटदाराच्या खर्चा मधून त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मार्च २०२३ मध्ये तब्बल कोट्यवधींच्या खर्चातून उभारलेला कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्प नागरिकांसाठी आकर्षण ठरला होता. पण अवघ्या दोन वर्षात अॅम्पी थिएटरच्या भिंतींना भेगा,स्टेजला तडे,गझिबोतील आसनांची मोडतोड, तोफांच्या चौथऱ्यांचे दगड उखडल्यासारखे गंभीर दोष समोर आले असल्याने तंत्रज्ञानाच्या पैशातून किंवा दुरुस्ती करून भागणार नाही तर निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा थट्टा त्यावर संबंधित ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झाली पाहिजे असे आमची मागणी आहे.. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही इतकं निकृष्ट काम झालं कसं, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

“दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” – काँग्रेसचा सवाल

काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात या प्रकल्पातील संपूर्ण कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या या प्रकल्पाचा “दोषदायित्व कालावधी संपला असला तरी एवढं नुकसान कसं झालं? आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” असा थेट सवाल काँग्रेसने केला आहे.प्रशासनाने कंत्राटदाराकडून स्वखर्चाने दुरुस्ती करून घेण्याचा दावा केला आहे. मात्र, काँग्रेसने या स्पष्टीकरणाला फोल ठरवत “हे भ्रष्टाचार झाकण्याचं पाऊल आहे. जर काम दर्जेदार झालं असतं तर एवढ्या लवकर दुरुस्तीची वेळच आली नसती,” असा घणाघाती आरोप केला आहे.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कराच्या पैशातून उभा केलेला प्रकल्प काही महिन्यांतच दुरावस्था होते, म्हणजे आमची फसवणूक झाली,” असा रोष त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावरही ठाणेकर महापालिकेच्या निष्काळजीपणावर सडकून टीका करत असून, “प्रत्येक प्रकल्प भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली का दबतो?” असा प्रश्न विचारत आहेत.
काँग्रेसच्या निवेदनामुळे या प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता राज्य सरकारच्या पातळीवर पोहोचला आहे. मुख्यमंत्री फडणवीस चौकशीसंदर्भात कोणता निर्णय घेतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांची एकच मागणी आहे “भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचवू नका, कारवाई करा.”

error: Content is protected !!