Homeठाणे-मेट्रोमहाराष्ट्रावर आलेले आस्मानी संकट दूर कर

महाराष्ट्रावर आलेले आस्मानी संकट दूर कर

शिवसेना नेते राजन विचारे सहकुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक

ठाणे :- पावसाने राज्यभर थैमान घातले असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. महाराष्ट्रावर आलेले आस्मानी संकट दूर कर, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे आज घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभी नाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सहकुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे. “नवसाला पावणारी अन, हाकेला धावणारी” असे या दुर्गेश्वरी देवीची ख्याती आहे. राज्यभरातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सहकुटुंब देवीची पूजा व आरती करून दर्शन घेतले. आम्ही तरुण असताना हा उत्सव पाहत आलेलो आहे. धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते या उत्सवात हिरीरीने सहभाग घेत असताना, उत्सवाची ही परंपरा अशी अखंड कायम राहील असा आम्हाला विश्वास वाटतो असे मत यावेळी विचारे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!