Homeठाणे-मेट्रोप्रभाग २७ मधील शिवसेनेचा जोरदार प्रचार

प्रभाग २७ मधील शिवसेनेचा जोरदार प्रचार

दिवा:-प्रभाग सत्तावीस मध्ये शिवसेनेचे उमेदवार हे पहिल्या दिवसापासूनच प्रचारात उतरले आहेत
प्रभाग क्रमांक 27 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार शिगेला पोहोचला असून शिवसेनेचे सर्व उमेदवार प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 27 मधील सर्व भागात स्वतः फिरत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेकडून या विभागात शैलेश मनोहर पाटील स्नेहा पाटील, दिपाली भगत व आदेश भगत हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. शिवसेनेचे सर्व उमेदवार हे आपल्या प्रभागामध्ये नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत असून त्यांना जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

error: Content is protected !!