दीपक जाधव ,साक्षी मढवी व दर्शना म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रचार रॅली
दिवा:- शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 28 चे उमेदवार रमाकांत मढवी साक्षी मढवी, दीपक जाधव व दर्शना म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने जोरदार बाईक रॅली व प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी दिवा शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिवा शहरातील प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे प्रभाग क्रमांक 28 ड मधून उभे असून प्रभाग क्रमांक 28 अ मधून दीपक जाधव तर प्रभाग क्रमांक 28 क मधून साक्षी रमाकांत मढवी व प्रभाग क्रमांक 28 ब मधून दर्शना म्हात्रे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.रमाकांत मढवी यांनी याआधी चौक सभांवर भर देत केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून दिवा शहरातील जनतेला शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या चौक सभांना दिवा शहरात उस्फुर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.मागील आठ वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच रमाकांत मढवी यांनी नागरिकांना दिवा शहरात विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे. मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भव्य अशी बाईक रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले.






