दिवा मनसेचे तुषार पाटील यांनी शाळा प्रशासनाला धरले धारेवर!
दिवा(सुहास खंडागळे):-दिव्यातील बि.आर.नगर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल शाळेने चालू शैक्षणिक वर्षाची सहा महिन्यांची आगाऊ फी काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी न भरल्याने त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवरून परत पाठवण्याचा संतापजनक प्रकार केला असल्याचे उघडकीस आले आहे.सदर शाळेने केलेल्या निंदनीय प्रकारचा निषेध आता दिव्यातील नागरिक व जाणकार करत आहेत.
ऑक्सफोर्ड शाळेत विद्यार्थ्यांना फी न भरल्याने वर्गात बसू न देण्याच्या तक्रारी पालकवर्ग करत आहे.शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचा निनंदनिय प्रकार शाळेने केल्याने आता शाळे विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
ऍडमिशन घेतलेल्या व आगाऊ फी न भरलेल्या पालकाच्या पाल्याला वर्गात बसू न दिल्याची तक्रार मनसेचे तुषार पाटील व पदाधिकाऱ्यांकडे आली होती.याबाबत शाळा प्रशासनाने पालकांची पिळवणूक करू नये,विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्यावे त्याच बरोबर पालकांना सवलत द्यावी अशी सूचना मनसेने केली होती.मनसेकडे ज्या तक्रार केली होती त्या पालकाने नवीन ऍडमिशन घेताना ७ हजार रुपये ऍडमिशन फी भरली आणि वार्षिक फीचे १८ हजार रुपये दोन टप्यामंध्ये भरण्यास सांगण्यात आले होते, पण आज अचानक शाळा प्रशासनाने संपूर्ण फी न भरल्यास शाळेत मुलांना बसू न देण्याचे आदेश देऊन मुलांना घरी पाठवले.
याच विषयावर मनसे विभाग अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष परेश पाटील , शाखाध्यक्ष शैलेंद्र कदम , महिला शाखाध्यक्षा अंकिता कदम, मनविसे शाखाध्यक्ष गौरव कदम यांनी शाळा प्रशासनाची भेट घेवून संबंधित प्राचार्यांना याचा जाब विचारून त्या पाल्याला ऍडमिशन घेताना ठरल्याप्रमाणे शाळेत घेण्याची तंबी दिली.
मुलांची मागील दोन वर्षांची फी भरली गेली नव्हती ती फी पालकांनी कर्ज काढून भरली , काही पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाची देखील ६ महिन्यांची फी आगाऊ भरली असल्याचे सांगितले. तरीदेखील ऑक्सफर्ड शाळेकडून पालकांना संपुर्ण वर्षाची फी एकत्रच भरण्यास किंवा पुढच्या सेकंड सेमिस्टर च्या फि चा चेक आगाऊ देण्यास सांगितले,तसे न करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेत बसू न देता घरी पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मनसे विभाग अध्यक्ष . तुषार भास्कर पाटील यांनी ऑक्सफर्ड शाळेचे संचालकांची आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत तुषार पाटील यांनी संपूर्ण वर्षाची फि एकत्र घेण्याचा किंवा पालकांकडून आगाऊ PDC चेक घेण्याला तीव्र विरोध केला. बैठकीअंती खालील विषयांवर संचालकांकडून मंजुरी घेण्यात आली.
ज्या पालकांनी या वर्षीची पहिल्या सेमिस्टर ची फी भरली आहे त्यांना दुसऱ्या सेमिस्टरच्या फी चा आगाऊ PDC चेक देण्याची सक्ती करू नये. ज्या पालकांची मागील थकबाकी पूर्ण भरलेली आहे, पण या वर्षीची पहिल्या सेमिस्टर ची फी भरलेली नाही त्यांना फि भरण्यासाठी किमान ३ महिन्याचा वेळ देण्यात यावा. ज्या पालकांची कोरोना काळातली फी बाकी आहे त्या मुलांच्या शाळेचे नुकसान न करता त्यांना वर्गात बसू द्यावे आणि पालकांना त्यांची मागील थकीत फी भरण्यासाठी अजून १ महिन्याची मुदत देण्यात यावी.
कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी असे या बैठकीत ठरले.