Homeठाणे-मेट्रोअखेर दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू

अखेर दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू

दिवा:-दिवा शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अखेर दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. याआधी मुंब्रा पोस्ट ऑफिस अंतर्गत दिव्यातील कारभार चालत होता.

शहरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस बाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन येथील नागरिकांच्या मागणीनुसार वारेकर शाळे जवळ विजय भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्याने दिव्यासाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. यामुळे दिवा शहरात पोस्टाबाबतच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभतेने मिळणार आहेत. स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू झाल्यानंतर दिवा शहरासाठी स्वतंत्र पिन कोड चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. या ठिकाणी अधिकचा स्टाफ रुजू राहणार असून नव्या पोस्ट ऑफिसमुळे नागरिकांना दिलासा मिळेल असे मत जागा हो दिवेकर संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

error: Content is protected !!