Homeठाणे-मेट्रोअखेर सिंबा पाळीव श्वान परतला ; २४ तासांनी श्वान घरी

अखेर सिंबा पाळीव श्वान परतला ; २४ तासांनी श्वान घरी

गाड्यांमधून फिरण्याचा आवडीने बसला असावा सिंबा श्वान रिक्षात

ठाणे :- विटाव्यातील सिंबा नामक पाळीव श्वान शुक्रवारी अचानक गायब झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तो सिंबा श्वान आयडीट एका रिक्षात बसून नवीमुंबईच्या दिशेने जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर २४ तासांनी अखेर सिंबा हा श्वान पुन्हा मूळ मालकाच्या घरी परतला आहे. ज्या रिक्षातून सिंबा जात होता. त्या रिक्षाचलकांचा श्वान देखील सिंबा याच्या सारखा दिसत असून तो काही दिवसांपासून हरवला आहे. त्यामुळे गैरसमजुतीतून तो आपलाच श्वान असल्याचे समजून ते चुकून त्याला घेऊन गेल्याचे सिंबा श्वानाचे पालनकर्ते सोहम सूर्यराव यांनी बोलताना सांगितले.
विटावा येथे राहणारे सूर्यराव हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सिंबा या श्वानाला घेऊन पटणी या मैदानावर घेऊन गेले होते. तेथे त्या मोकळे सोडण्यात आले. याचदरम्यान सिंबा आवाज देऊन येत नाही तसेच कुठेही दिसत नाही. म्हणून सूर्यराव यांनी त्याचा शोध घेतला. पण, तो मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याचदरम्यान पोलिसांच्या मदतीने तपासणी केलेल्या सीसीटीव्हीत सिंबा हा नवीमुंबईकडे एका रिक्षातून जात दिसत होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्रीभर शोध लागला नाही. मात्र सकाळी सिंबा हा पुन्हा घरी परतला. हा प्रकार त्या रिक्षातून नेणाऱ्या चालकाने सांगितला. अशी माहिती सूर्यराव यांनी दिली. तर गायब झालेला सिंबा परतल्याने सूर्यराव कुटुंबाला आनंद झाल्याचे दिसत होते.
फिरण्याचा आवडीने बसला असावा सिंबा रिक्षात…
सिंबाला गाडीतून फिरण्याची खूप आवड आहे. त्यातूनच तो त्या रिक्षा बसून गेला असावा. त्याला घाटकोपर येथील रिक्षाचालकाने त्यांचाच श्वान समजून नेले. मात्र व्हायरल व्हिडिओने त्यांनी शनिवारी सकाळी सिंबा घरी आणून दिले. अशी माहिती सिंबा या श्वानेच पालककर्ते सोहम सूर्यराव यांनी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!