Homeकोकण-महाराष्ट्रआगीत दोन मीटर बॉक्स जळून खाक

आगीत दोन मीटर बॉक्स जळून खाक

ठाणे: ढोकाळी नाक्यावरील शरदचंद्र मिनी स्टेडियम बाजुला असलेल्या स्वामी कृपा इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास घडली. यामध्ये दोन मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. तर या महिन्यात अशाप्रकारे मीटर बॉक्सला आग लागल्याची शहरातील ही चौथी घटना आहे.

     ढोकाळी नाक्यावर स्वामी कृपा ही तळ अधिक सात मजली इमारत आहे. तिच्या मीटर रूमला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. महावितरणचे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. आहे.

error: Content is protected !!