Homeठाणे-मेट्रो... आणि त्या ज्येष्ठ नागरिकांची हरवलेली दृष्टी मिळाली परत

… आणि त्या ज्येष्ठ नागरिकांची हरवलेली दृष्टी मिळाली परत

ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शस्त्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा दृष्टी लाभली

ठाणे स्थानक परिसरात हे ज्येष्ठ नागरिक एकटे जगत होते अंधारमय जीवन

ठाणे :- वाढलेले वयोमान.. हालाकीची परिस्थिती अशातच डोळ्यांनी धूसर दिसत असल्याने जीवनात अंधार पसरलेला असताना, सिव्हिल रुग्णालयाने एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यांमध्ये आनंदाची ज्योती आणली आहे. ठिकठिकाणी रुग्णालयात डोळ्यांचा इलाज होणार नाही असं सांगितल्या नंतर ठाणे रेल्वे स्थानकात हताश होऊन बसलेल्या अजीज शेख यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर, त्याची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे.

भिवंडी परिसरात राहणाऱ्या अजीज शेख (७९) हे पूर्वी छोटी मोठी नोकरी करून स्वतःचा चारितार्थ करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अंधुक दिसत असल्याने नोकरी करणे अवघड होऊन बसलं. कौटुंबिक परिस्थिती देखील बेताची असल्याने वृद्धाप्तक काळात देखील कामाची आवश्यकता होती. परतू डोळ्यांना व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अजीज यांच्या समोर मोठी समस्या बनून राहिली होती. ठाणे स्थानक परिसरात काही दिवसांपासून एकटेच राहत होते. यावेळी समाज सेवक राघवेंद्र तिवारी यांना अजीज दिसले. त्यांची विचारपूस केली असता, डोळ्यांनी दिसत नसल्याने अजीज यांनी सांगलगितले. ठाणे सिव्हील रुग्णालयात डोळ्यांच्या चांगल्या शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे राघवेंद्र यांनी अजीज यांना सिव्हिल मध्ये उपचारासाठी घेऊन आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजीज यांच्या दोन्ही डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अजीज यांची शारीरिक तपासणी करून घेतली. त्यानंतर रुग्णालयातच उपचार सुरू ठेवून आठ दिवसांच्या अंतराने दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया काही मिनिटांची असली तरी रुग्णालयासाठी आव्हान होत. परंतु शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आमच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणाले. . मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे, नेत्रतज्ज्ञ चिकीत्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर, अश्विनी… आदींनी अथक परिश्रम घेतले

” माझ्या दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे खूप हताश झालो होतो. डोळ्यांवर इलाज करण्यासाठी मुंबई बरोबर ठाण्यातील काही रुग्णालयात दाखवलं मात्र सर्वांनी नकार दिला. ठाणे स्थानक परिसरात एकटाच कसातरी राहत होतो. दरम्यान समाजसेवक राघवेंद्र तिवारी मला सिव्हिल रुग्णांलयात आणलं आणि या ठिकाणी माझ्या दोन्ही डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आज सिव्हिल रुग्णालयामुळे मला व्यवस्थित दिसू लागले आहे. त्यामुळे माझी रोजीरोटी मिळवू शकतो. “- अजीज शेख ( रुग्ण)

error: Content is protected !!