दिवा:-मागील वर्षभरापूर्वी भारतीय जनता पार्टी मधून शिवसेनेत दाखल झालेले ऍड.आदेश भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे नियुक्तीपत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदेश भगत यांना दिले असून यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी उपस्थित होते. आदेश भगत हे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्ष समाजकारणात सक्रिय असून शिवसेनेत प्रवेश करण्याआधी ते भारतीय जनता पार्टी दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने त्यांच्यावर दिवा उप शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.