दिवा – दिव्यातील नागरिकांना औषधोउपचारासाठी शीळफाटा येथील आरोग्य केंद्रात जावं लागायचं.दिवा शहरातील नागरिकांची ही गैरसोय कायमस्वरुपी दूर होणार असून दिव्यात स्वतंत्र आरोग्य केंद्र होणार आहे.आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी नुकतीच माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि पालिका अधिकाऱ्यांनी केली. विकास म्हात्रे गेट येथील मातोश्री नगरमधील डु ड्राॕप शाळे समोर एकूण दहा गाळे आरोग्य केंद्रासाठी भाडे तत्वावर घेण्यात आले असून लवकरच हे आरोग्य केंद्र दिव्यातील नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याची पहाणी करण्यासाठी रमाकांत मढवी, माजी नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे, तसेच विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यकर्ते आणि महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.