ठाणे : एच आय व्ही एड्स या रोगाचे प्रमाण कमी झाले असले तरी, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्यप्रशासन, सामाजिक संस्था, एनजीओ या सर्वांनीच एकत्रित पणे काम करणे आवश्यक आहे. एड्सचे समूळ उच्चाटनासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन आरोग्यसेवा संचालक नितीन अंबाडेकर यांनी केले.
जागतिक एड्स दिन” निमित्त सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, ठाणे यांच्यामार्फत “जागतिक एड्स दिन-२०२४” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महापालिकेच्या स्व. दादा कोंडके एम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी आरोग्य सेवा पुणे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ. अर्चना पवार, रतन गाढवे, अशोक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी एच.आय. व्ही. एड्स कशामुळे होतो. त्यामागील प्रमुख चार कारणांची माहिती दिली. त्याचप्रमाणे महाविदयालयीन विदयार्थ्यांना एचआयव्ही निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्हयातील मोफत औषधोपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यानच्या कार्यक्रमात जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशन मार्गे तीन हात नाका सर्विस रोड मार्गे स्वर्गीय दादा कोंडक अम्पिथीटर, ठाणे येथे विसर्जित करण्यांत आली. उत्कृष्ट काम करणाऱ्या आयसीटीसी, एआरटी, सुरक्षा केंद्र, क्षयरोग विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प गट, रक्तपेढी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.