Homeशहर परिसरकाल उदघाटन झालेला सरकता जिना अवघ्या काही तासात तांत्रिक कारणाने झाला बंद

काल उदघाटन झालेला सरकता जिना अवघ्या काही तासात तांत्रिक कारणाने झाला बंद

दिवा:-बुधवारी शिवसेना आणि भाजपने उदघाटन केलेला दिवा पूर्वेकडील सरकता जिना 24 तासाच्या आत बंद पडला.
तांत्रिक कारणामुळे हा जिना बंद पडला असल्याची प्राथमिक माहिती असून प्रवासी गर्दीने जास्त लोड आल्याने जिना बंद पडला असावा असे नागरिकांचे मत आहे.रात्री अकरा वाजता उतरणारा जिना बंद झाला तर आज दुपारी चार वाजता चढणारा जिना बंद झाल्याची माहिती मिळत आहे.

error: Content is protected !!