दिवा:-गणेशोत्सव चार दिवसांवर आला असूनही दिवा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही ठाणे महानगर पालिके कडून बुजविण्यात आलेले नाहीत. याबाबत आज दिवा मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले.
मनसेच्या आंदोलनाची कुणकुण लागताच लगेचच पालिकेकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यासाठी सुरवात करण्यात आली. पण तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम करून पालिका थूकपट्टी लावायचे काम करत असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले.
दिवा शहरातील खड्डे पालिकेने तत्काळ न बुजवल्यास अधिकाऱ्यांना आणून याच खड्ड्यात उभे करू असा इशारा तुषार पाटील यांनी दिला आहे.