Homeशहर परिसरखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डायघर येथे कॉंक्रीट रस्त्याचे आमदार राजेश...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डायघर येथे कॉंक्रीट रस्त्याचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उत्साहात भूमिपूजन

दिवा: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक आमदार राजेश मोरे तसेच माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या विशेष सहकार्याने, डायघर गावातील शिवसैनिकांची बऱ्याच काळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. डायघर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या ओंकारेश्वर मंदिर परिसरातील सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेश मोरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
डायघर गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. भाविकांची होणारी गैरसोय आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन या कामाला प्राधान्याने मंजुरी देण्यात आली होती. या नवीन कॉंक्रीट रस्त्यामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या वैभवात भर पडणार आहे.
या मंगलप्रसंगी आमदार राजेश मोरे यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील, उपविभाग प्रमुख दिपेश पाटील, मधुकर पाटील, शाखाप्रमुख बाबुराव पाटील, शाखाप्रमुख संदेश पाटील, शाखाप्रमुख महेश पाटील यांच्यासह विभागातील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकासकामांचा आढावा घेत भविष्यातही प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या विकासकामाबद्दल डायघर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!