Homeठाणे-मेट्रोगणेशोत्सवापुर्वीच भंडार्ली कचरा प्रकल्प बंद होईल; भेटीत मुख्यमंत्र्यांचे स्थानिकांना आश्वासन

गणेशोत्सवापुर्वीच भंडार्ली कचरा प्रकल्प बंद होईल; भेटीत मुख्यमंत्र्यांचे स्थानिकांना आश्वासन

ठाणे : भंडार्ली येथील कचरा प्रकल्प दिलेल्या कालावधीत बंद न झाल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यांना मनसेच्या आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची साथ लाभली. तसेच महापालिकेवर धडक दिल्यावर आयुक्तांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी ती भेट झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवापुर्वी म्हणजे १५ सप्टेंबर आधीच भंडार्ली येथे कचरा टाकला जाणार नसल्याचे आश्वासन दिले.असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

तसेच १४ गावांचा समावेश नवीमुंबईत करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. परंतु तो पर्यंत येथील विकास कामांसाठी १४० कोटींच्या निधीला त्यांनी मंजुरी दिली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी मनसेचे आमदार प्रमोद पाटील आणि स्थानिकांनी भंडार्ली येथील कचरा प्रकल्प बंद पाडला होता. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी भेट घेऊन येथील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली होती. तसेच एका आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली नाही तर मात्र भंडार्लीला एकही कचऱ्याची गाडी जाऊ दिली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. तसेच नवी मुंबई महापालिकेत १४ गावे समाविष्ट करण्याबबातही यावेळी चर्चा झाली होती.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत यापूर्वी १४ गावे नवी मुंबई मनपा मध्ये समाविष्ट करण्याकरिता सरकार ने अधिसूचना काढली आहे. परंतू हरकत व सुचनांनंतरची अंतिम अधिसूचना तांत्रिक बाबी मुळे अद्याप काढली नाही व त्यामुळे या गावांमधील विकास कामे ठप्प झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. तसेच अंतिम अधिसुचना निघेपर्यंत या गावांना विकास कामांसाठी निधी देण्याची व भंडार्ली येथील डंपींग ग्राउंड बंद करण्याबाबत विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी भंडार्ली येथील कचरा प्रकल्प येत्या १५ सप्टेंबरच्या आधी बंद करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरात लवकर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल असे सांगितले व तो पर्यंत १४ गावातील विकास कामांसाठी नगरविकास विभागातून ७० कोटी तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून ७० कोटी असे एकूण १४० कोटी निधी देण्याचे जाहीर केले.

error: Content is protected !!