Homeठाणे-मेट्रोघरगुती गॅस दरवाढी विरोधात दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून निदर्शने

घरगुती गॅस दरवाढी विरोधात दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून निदर्शने

दिवा:- घरगुती गॅस दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यात केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर महागाई विरोधात सत्ताधारी पक्षाने साधलेली छुपी यावर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हल्लाबोल करण्यात आला.

गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे यातच आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात आज संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले.
मुंबईसह उपनगरात सीएनजी दीड रुपयाने तर पीएनजी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयांनी वाढला आहे.हेच का मोदीचे अच्छे दिन असा सवाल विचारत दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवर जेवण बनवून भाजप सरकारचा निषेध केला. सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे. देशात उज्वला योजना राबवून मोदींनी मन की बात मध्ये म्हटले होते की महिलांचे धुराचे अश्रू मला पहावत नाहीत म्हणून उज्वला योजना राबवण्यात आली परंतु आज याच सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केले.यावेळी उपशहर प्रमुख तेजस पोरजी, उपशहर संघटक प्रवीण उतेकर,विभाग प्रमुख नागेश पवार, संजय जाधव, रवी रसाळ, शनिदास पाटील, उपविभाग प्रमुख अजित माने,शाखाप्रमुख राजेश गुप्ता,नितीन काळे, विजय कदम,विभाग संघटिका सुवासिनी गुडेकर,उप संघटिका अशा इंगोले, शाखा संघटिका संगीता मचाडो,स्वाती चव्हाण आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!