दिवा:-तनवी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्योती पाटील यांनी महिलांसाठी नवरात्री विशेष स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची व उखाणा स्पर्धेचा समावेश होता.
संगीता खुर्ची स्पर्धेत श्रुती पवार,मिनाक्षी शिंदे,विवेक सिंग हे विजेते ठरले तर
पाककला स्पर्धेत शुभा बने पहिली विजेता ठरली.तिला वोशिंग मशिन, पैठणी बक्षीस प्रदान करण्यात आले.
मनीषा रेडकर दुसरी विजेता ठरली. तिला कुलर, पैठणीबक्षीस मिळाले.
पुनम लाड तिसरी विजेता ठरली तिला मिक्सर व पैठणी बक्षीस मिळाले.उज्वला काळे चौथी विजेता डिनर सेट ,प्रणाली नाईक पाचवी विजेती पैठणी डबा,भाग्यश्री जाधव सहावी,राधिका पाठक सातवी,सविता सरफरे आठवी तरसुरभी सावंत नववी विजेता ठरली.
स्पेशल उखाना स्पर्धेत उषा साळुंखे विजेता ठरली. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागी महिलांची ज्योती पाटील यांनी आभार मानले.