दिवा:-तन्वी फाउंडेशन व आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांनी प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.