Homeठाणे-मेट्रोठाणे खाडीत तरुण बुडाला ; मृतदेह सापडला कळवा खाडीत

ठाणे खाडीत तरुण बुडाला ; मृतदेह सापडला कळवा खाडीत

ठाणे : खारटन रोड, महागिरी कोळीवाडा येथील गणपती विसर्जन घाट येथे खाडीत व्यंकटेशकुमार अय्यनुस्वामी यादव (३३) हा तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. शोध मोहिमेत व्यंकटेशचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला. कळवा पूर्व येथील आनंद नगर येथे राहणारा व्यंकटेश कुमार आपल्या 8 वर्षीय मुलाला सोबत घेऊन रिक्षाने त्या गणपती विसर्जन घाट येथे आला होता. मुलाला रिक्षात ठेवून तो त्या घाटावर गेला. याचदरम्यान तो बुडत असल्याची बाब त्या मुलाच्या निर्दशनास आल्यावर त्याने रिक्षावाल्याला सांगितले. व्यंकटेश हा पाण्यात अदृश्य झाल्याचे पाहून रिक्षावाला त्या मुलाला घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयात गेले. तेथे त्या मुलाचे वडील बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या व्यंकटेशचा शोध स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या साह्याने खाडीमध्ये अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल या विभागांच्या मदतीने सुरू केल्यावर त्याचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला आहे. मात्र त्याने उडी घेतली की तो खाडीच्या पाण्यात पडला याबाबत अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!