Homeठाणे-मेट्रोठाणे जिल्हा रुग्णालयात दहा महिन्यात तीन हजार 40 शस्त्रक्रिया

ठाणे जिल्हा रुग्णालयात दहा महिन्यात तीन हजार 40 शस्त्रक्रिया

ठाणे : शासकीय रुग्णालय म्हटले की नाके मुरडली जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे जिल्हा (सामान्य) विठ्ठल सायन्ना या शासकीय रुग्णालयात आता जोखमीच्या शस्त्रक्रियेची संख्या काही दिवसात वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दहा महिन्यात तीन हजार 40 शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये दोन हजार 367 अवघड शस्त्रक्रिया आहे. सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया या एका महिन्याला होताना दिसत आहे. यासाठी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूला ही ‘ पॉवर ‘ मिळत असल्याचे दिसून आली आहे.
टेंभीनाका परिसरात असलेल्या ठाणे जिल्हा (सामान्य) विठ्ठल सायन्ना या शासकीय रुग्णालयाचे सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर होत आहे. त्यामुळे जुने रुग्णालय पाठवून नवे रुग्णालय उभारण्याचे जोरात काम सुरू आहे. त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वागळे इस्टेट येथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र तात्पुरत्या स्थलांतरित झालेल्या रुग्णालयात ही उपचार करताना, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी 300 ते 325 शास्त्रिक्रिया पार पडत आहेत. जून ते मार्च 2024 या दहा महिन्यापर्यंत 3 हजार 40 रूग्णांवर यशस्वी पार पडल्या आहेत. यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. तर, गेल्या १० महिन्यात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या (LSCS) १६२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सोबतच डोळ्यांच्या ४२४, दंत २२९, अस्थी २००, या बरोबर पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

” शस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. गेल्या नऊ महिन्यात एकूण 3 हजार 40 शस्त्रक्रिया पार पडल्या बाबत दुजारो देत, काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहे. “- डॉ. कैलास पवार , जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

error: Content is protected !!