Homeठाणे-मेट्रोठाण्यात आगीच्या तीन घटना ; महापालिका आवारातील ट्रान्सफॉर्मरला व केबलचा समावेश

ठाण्यात आगीच्या तीन घटना ; महापालिका आवारातील ट्रान्सफॉर्मरला व केबलचा समावेश

ठाणे: शहरात सकाळपासून दुपारपर्यंत तीन किरकोळ आगीच्या घटना समोर आल्या. त्यामध्ये एक घटनेत ठाणे महापालिका आवारात असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला व केबलला आग लागल्याने घबराट पसरली होती. मात्र ती आग ही किरकोळ असल्याचे समोर आल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कळवा परिसरातील विटावा जकात नाक्याच्या बाजूला मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कचऱ्याला आग लागली होती. ती अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ नियंत्रणात आणली. दुसरी घटना साधारणपणे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास नौपाडा, जिजामाता उद्यान येथे समोर आली. या घटनेत तेथील महावितरणच्या केबलला शॉर्टसर्किट होऊन बाजूला असलेल्या झाडाला आग लागली.
ती आग स्थानिकांनी धाव घेत, नियंत्रणात आणली. तसेच तिसरी घटना तीन वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडी येथे महापालिका मुख्यालय याठिकाणी असलेल्या गेट नंबर ५ जवळ महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला व केबलला किरकोळ आग लागली होती. या आगीने घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना लागलेल्या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!