Homeठाणे-मेट्रोठाण्यात वाढू लागले साथीचे आजार: मलेरिया २०,टायफाईड २२ तर डेंग्यूचे ७ रुग्ण

ठाण्यात वाढू लागले साथीचे आजार: मलेरिया २०,टायफाईड २२ तर डेंग्यूचे ७ रुग्ण

ठाणे : पावसाने शहरात आपली दमदार हजेरी लावल्यानंतर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आता साथीचे आजार ही वाढू लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने मलेरिया, टायफाईड, हगवण आणि इन्फ्लुएंन्जा या सारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या २० च्या वर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच डेंग्यूचे सात रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी १ ते १८ जुलै या कालावधीतील आहे. साथ आजारांवर मात करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून त्यांनी काही महत्वाच्या उपाययोजना देखील हाती घेतलेल्या आहेत.
पावसाळा सुरु झाल्यावर साथ आजारांचे प्रमाण देखील वाढतांना दिसत असते. परंतु या आजारांचा सामना करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही दिसून येत आहे. परंतु असे असले तरी जुन पाठोपाठ आता जुलै महिन्यातही साथ आजार वाढू लागल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने घरोघरी जाऊन केलेल्या सर्व्हेक्षणात ५० हजार २२१ घरांची तपासणी केली असता ५२७ घरातील पाणी दुषित आढळले आहे. तर ६१ हजार ९६३ कंटेनरची तपासणी केली असता, ५६९ कंटेनर दुषित आढळले आहेत. पैकी २३० कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले असून ३३२ कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत. तसेच ७ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे महापालिका हद्दीत १०० हॅन्डपंप, ९ बोलोरे वाहनांमार्फत दोन सत्रात २८५७ ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅन्डमशीन द्वारे २९ हजार ०३९ ठिकाणी धुरफवारणी करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
साथरोग आजार
मलेरीया – २०
डेंग्यु – ०७
चिकनगुनिया – ००
इन्फ्ल्युएन्जा – २३
लेप्टो – १६
कावीळ – ०८
टायफाईड – २२
हगवण – २८

error: Content is protected !!