Homeठाणे-मेट्रोठाण्यातील लाखो गणेशभक्तांची लालपरीला पसंती  

ठाण्यातील लाखो गणेशभक्तांची लालपरीला पसंती  

दोन हजार ४८१ गाड्यांची बुकिंग हाऊसफुल, गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या झाल्या कोकणात रवाना

ठाणे: कोकणवासीयांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी एसटी विभाग दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणात सुखरूप नेण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे विभागातून यंदा लालपरीची ‘विक्रमी’ स्वारी होणार आहे. ठाणे विभागीय कार्यालयाच्या आगारातून सुमारे दोन हजार ५०० बसेस किंवा त्यापेक्षा बसेसमधून गणेशभक्तांना घेऊन जाणार आहेत. त्यातील दोन हजार ४८१ बसेस हाऊसफुल झाल्या आहेत. यामध्ये दोन हजार ०६४ बसेस ग्रुप बुकिंगच्या उर्वरित ४१७ बसेस आरक्षण बुकिंगच्या आहे. तर गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या कोकणात गणेशभक्तांना घेऊन रवाना झाल्या आहे. तर एकूण बुकिंग गाडयांपैकी जवळपास १ हजार २०० गाड्या या राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून बुकिंग झालेल्या आहेत.
येत्या ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी-गणपती या सणाला येत्या ०३ ते ०६ सप्टेंबर दरम्यान मुख्य वाहतुक केली जाणार आहे. यंदा दोन हजार ०३२ गाड्यांचे नियोजन ठाणे (एसटी) विभागाने केले आहे. त्यापेक्षा अधिक जवळपास ५०० गाड्यांची बुकिंग झाल्याने अशाप्रकारे दोन हजार ४८१ बसेस हाऊसफुल होऊन ठाणे विभागीय कार्यालयाची विक्रमी नोंद झाली आहे. गतवर्षापेक्षा यंदा ५०० अधिक गाड्यांची संख्येत वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. विविध सवलतीमुळे पुन्हा एसटीला पसंती देत प्रवासी एसटीकडे वळताना दिसत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.

ही आहेत प्रमुख बसेस सुटण्याची ठिकाणे
ठाणे- खोपट,बोरिवली, भाईंदर,मुलुंड, भांडूप, डोंबिवली,कल्याण, विठ्ठलवाडी आणि दिवा अशी आहेत.
या विभागांची ठाण्याला मदतीचा हात
ठाणे विभागाच्या मदतीला एकूण एक हजार ७०० गाड्या धावून आल्या आहेत. गतवर्षापेक्षा ६० गाड्या यंदा जादा आहेत. यंदा मुंबई प्रादेशिक, पुणे प्रादेशिक आणि नाशिक प्रादेशिक येथील गाड्यांचा समावेश आहे.
जाताना पाच तर येताना तीन ठिकाणी थांबा
कोकणात मुंबई गोवा महामार्गाने जाताना चाय पान आणि प्राथमिक विधीसाठी पाच हॉटेल च्या ठिकाणी थांबा दिला आहे. तसेच येताना तीन ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे.
गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना
ठाणे विभागाकडून संपाच्या दिवसात योग्य नियोजन करून ३ सप्टेंबरला २२, ४ सप्टेंबर ४८२ गाड्या सोडण्यात आल्या. तर गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना झाल्या आहे. तर ५ सप्टेंबर ला ९६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!