Homeठाणे-मेट्रोडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिव्यात मेणबत्ती शांतता रॅली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिव्यात मेणबत्ती शांतता रॅली

दिवा:- दिव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ठीक १०.०० वाजता मेणबत्ती शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष:- दिनेश पाटील व कार्याध्यक्ष दीपक जाधव यांनी सिद्धार्थ बुद्ध विहार आणि जय भिम स्तभाकडे भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

दिव्यात या मेणबत्ती रॅली ला सुरुवात सम्यक समता मंडळ. स्थळ दातिवली तलाव, दिवा आगासन रोड, बी.आर. नगर. मार्गे सिद्धार्थ बुद्ध विहार, व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ते दिवा शिळ मार्गे दिवा रेल्वे स्टेशन जवळ जय भीम स्तंभ येथे सांगता करण्यात आली.
जय भीम स्तंभ येथे त्या ठिकाणी रात्री ठीक १२.०० वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर ला सकाळपासून जय भिम स्तंभाकडे धम्म बांधव व भगिनी, सामाजिक व धार्मिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

error: Content is protected !!