Homeशहर परिसरदिवा ग्रामस्थांच्या वतीने देवी देवतांचा मूर्ती मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न

दिवा ग्रामस्थांच्या वतीने देवी देवतांचा मूर्ती मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न

रविवारी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा

दिवा:-श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ दिवा स्टेशन यांच्या वतीने श्री गणेश, श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण,सीता या देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मंदिर जिर्णोद्धार सोहळा रविवारी संपन्न होणार आहे.या सोहळ्याअंतर्गत शुक्रवारी सकाळपासून मूर्तींचा मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात वाजत गाजत पार पडला.
हनुमान मंदिर -कुलस्वामिनी मंदिर – गावदेवी मंदिर – हनुमान मंदिर असा हा मूर्ती मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. गाव प्रदक्षिणा घालून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरात मूर्ती मिरवणूक सोहळा संपन्न झाला.

यावेळी दिवा ग्रामस्थ महिला भगिनी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात देवतांच्या मूर्तीचा हा मिरवणूक सोहळा पार पडला.

error: Content is protected !!