दिवा:- दिवा पश्चिमेकडील ठाणे महानगरपालिका शाळा आता कात टाकणार आहेत.शाळेतील दुरावस्था झालेल्या भागाची दुरुस्ती,रंगरंगोटी,सुशोभीकरण यांसह अन्य कामे करण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना दिवा शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी,उपशहर प्रमुख नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, नगरसेविका सौ. दिपाली उमेश भगत यांच्या मागणीनुसार दिवा पश्चिम येथील ठामपा शाळा क्रमांक ७९/९८ मधील अंतर्गत शौचालय, सर्व खोल्यांमधील प्लास्टरिंग व रंगरंगोटी, सेफ्टी टॅंक, टाईल्स बसवणे व इतर कामाचा नुकताच श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, दिवा ग्रामस्थ सोमनाथ भगत, विनायक पाटील, सोनू पाटील, शाखाप्रमुख नितीन ओतूरकर, उपशाखाप्रमुख सुनील शिंदे, महेश भगत, आकाश वसावे आदी कार्यकर्ते व पालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत व कामाचा दर्जा राखावा अशा सूचना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या.






