दिवा:- दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज शनिवार दुपारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
कल्याण लोकसभेचे संपर्क प्रमुख खोत यांच्या माध्यमातून मुंडे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते.आता मुंडे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.