Homeशहर परिसरदिवा शहरात 'मंगळागौर' स्पर्धेचा जल्लोष, 'साज ह्यो तुझा' ठरला विजेता, शैलेश पाटील...

दिवा शहरात ‘मंगळागौर’ स्पर्धेचा जल्लोष, ‘साज ह्यो तुझा’ ठरला विजेता, शैलेश पाटील यांचे आयोजन

दिवा:- दिवा शहरात शैलेश पाटील आयोजित व शिवसेना पुरस्कृत ‘ मंगळागौर’ राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या स्पर्धेत ‘साज ह्यो तुझा’ ग्रुप (पलावा, डोंबिवली) यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना रोख २१,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
मा. नगरसेवक श्री. शैलेश मनोहर पाटील यांच्या पुढाकाराने आणि सौ. किरण संतोष शितकर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील अनेक महिला मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी आणि नृत्यांनी संपूर्ण वातावरण भारले होते.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक ‘शिवाज्ञा ग्रुप’ (नालासोपारा) यांनी मिळवला असून, त्यांना १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. तर, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ‘अष्टभुजासखी ग्रुप’ (ठाणे) यांनी पटकावले असून, त्यांना १०,००० रुपये रोख देण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिके
* प्रथम उत्तेजनार्थ: एस डी ए क्वीन्स, चेंबूर
* द्वितीय उत्तेजनार्थ: नवरंग ग्रुप, कांदिवली
* तृतीय उत्तेजनार्थ: आदिशक्ती ग्रुप, ऐरोली
* चतुर्थ उत्तेजनार्थ: सखी रसायनी, पनवेल
* पाचवा उत्तेजनार्थ: शिवशक्ती ग्रुप, दिवा
याव्यतिरिक्त, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला गटांना आयोजक श्री. शैलेश पाटील यांनी प्रत्येकी ५,००० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. दिवा शहरात आयोजित या स्पर्धेमुळे मंगळागौरीची पारंपरिक संस्कृती जपली गेली, तसेच महिला कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असे आयोजकांनी सांगितले.

error: Content is protected !!