Homeठाणे-मेट्रोदिवा शहरातील अंतर्गत स्वच्छतेबाबत ; नगरसेवक आदेश भगत यांनी घेतली सफाई कामगारांची...

दिवा शहरातील अंतर्गत स्वच्छतेबाबत ; नगरसेवक आदेश भगत यांनी घेतली सफाई कामगारांची भेट

दिवा:दिवा शहरातील अंतर्गत स्वच्छता अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना दुर्गंधीमुक्त वातावरण देण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख तथा स्थानिक नगरसेवक अँड. आदेश कमलाकर भगत यांनी मंगळवारी सकाळी विशेष मोहीम आखली. सकाळी ६:३० वाजता त्यांनी प्रभागातील सफाई कामगारांच्या हजेरी शेडला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान आदेश भगत यांनी उपस्थित कंत्राटदार आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दिवा शहरातील वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याची समस्या लक्षात घेता, स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांनी खालील प्रमुख सूचना केल्या:
दैनंदिन साफसफाई: शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि महापालिकेने तयार केलेले अंतर्गत रस्ते यांची दररोज नियमाने साफसफाई झालीच पाहिजे.
घंटागाडीचे नियोजन: कचरा उचलणारी घंटागाडी निश्चित वेळेत प्रभागात आली पाहिजे, जेणेकरून कचरा साचून राहणार नाही.
दक्षता: अंतर्गत गल्ल्यांमधील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदारांना दिले.

यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनीही आपल्या काही समस्या मांडल्या, ज्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन भगत यांनी दिले. सकाळीच नगरसेवक स्वतः हजेरी शेडवर आल्याने कर्मचाऱ्यांमध्येही शिस्त पाहायला मिळाली.

error: Content is protected !!