दिवा शहराच्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे, हे अत्यंत दुर्दैवी सत्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवा शहरातील अनेक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि आता यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. दिवा शहरात असणाऱ्या समस्या या नक्कीच सुटतील मात्र त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती इच्छाशक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. मुळात येतील मूलभूत समस्या आपण समजून घेतल्या तर त्यावर उपाययोजना करता येतील.
पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचा अभाव
दिवा शहरात पाणीटंचाईची समस्या खूप गंभीर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी नियोजन नाही. अनेक सर्वसामान्य नागरिकांना एक-एक किलोमीटर लांबून पाणी आणावे लागते. पदवी कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तर नियमित पाणीटंचाईचा सामना करावा लागतो अक्षरशा नाल्या मधून पाण्याच्या लाईन आणल्या जातात.या पाईपलाईन अनेकदा गटारात तुटलेल्या आढळतात, ज्यामुळे पाणी दूषित होते. पाण्याच्या टाक्यांसाठी होता, पण सीआरझेड कायदा आडवा आल्याचे सांगितले जाते यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण होऊ शकले नाहीत. व्हिजन नसलेली माणसं सत्तेत असल्याने हे प्रकार होतात.एकीकडे, अनधिकृत पाणी कनेक्शन (चोरीचे टॅप) घेणाऱ्यांना अमर्याद पाणी मिळते, तर दुसरीकडे साबे आणि दिवा गावांसारख्या भागांत पाणी कमी प्रमाणात मिळते. या असंतुलित वितरणाने दिव्यात अनेक भागात पाणीटंचाई होते.चोरीचे पाणी विकणाऱ्यांनी दिव्यात पाण्याच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले आहे.
आरोग्यसेवा आणि स्वच्छतेचा प्रश्न
दिवा शहरातील आरोग्यव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. महापालिकेने उघडलेले छोटे दवाखाने नागरिकांसाठी पुरेसे नाहीत. शहरात एकही मोठे पालिकेचे रुग्णालय नाही. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने स्मशानभूमींची संख्या अपुरी आहे. तसेच, डंपिंग ग्राउंड बंद झाल्याची घोषणा झाली असली, तरी कचरा अजूनही लपून छपून टाकला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांची उपेक्षा
पालिकेच्या शाळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे आणि त्या दहावीपर्यंत असाव्यात, अशी मागणी आहे. शहरात समाज मंदिर आणि मोठे सभागृह (हॉल) नाहीत, ज्यामुळे सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध होत नाही. या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा प्रश्न
दिवा शहरातील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मागणी करूनही ते हटवले जात नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेरीवाल्या विरोधात कायमच रस्त्यावर उतरली आहे. मात्र सत्तेत असणाऱ्यांना फेरीवाले हटवता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.शहरातील रस्ते अरुंद झाले आहेत. पार्किंगच्या नियोजनाचा अभाव असल्याने वाहने रस्त्यांवर उभी केली जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. दिवा तलावाजवळ पार्किंग प्लाझा बांधल्यास स्टेशन परिसरातील वाहतूक समस्या सुटू शकते. दुर्दैवाने, हा तलावही अतिशय दूषित झाला आहे.
भविष्याची दिशा
जर दिव्यातील जनतेने आम्हाला सत्तेवर आणले, तर आम्ही हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही रस्ते मोकळे करू, पार्किंगचे योग्य नियोजन करू आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पुरवू. दिवा शहराचा विकास करून त्याला खऱ्या अर्थाने एक विकसित आणि सुव्यवस्थित शहर बनवणे हे आमचे ध्येय आहे.
– तुषार पाटील,शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना,दिवा शहर