दिवा :- मुंब्रा स्टेशन येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाने दिवा-सीएसएमटी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वेला निवेदन दिले आहे.
दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर वतीने जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या आदेशाने, जिल्हा संघटक तात्या माने यांच्या उपस्थितीत, शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांस दिवा- सी.एस. एम .टी. लोकल सुरू करण्याच्या मागणी साठी निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा संघटीका योगिता नाईक, शहर संघटीका ज्योती पाटील, शहर समन्वयका प्रियांका सावंत, उप शहर संघटीका स्मिता जाधव, विभाग प्रमुख रवी रसाळ, नागेश पवार, उपविभाप्रमुख योगेश निकम, संजय निकम, अजित माने,संदिप राऊत ,शाखा प्रमुख नितीन काळे, प्रिया भोईर ,श्रावणी कदम, प्रिया भोईर, विलास उत्तेकर , नितीन सावंत, संजय डोंगरे ,राजेंद्र शिरसेकर, उमेश भानसे, गणेश सावंत,अरुण लोकरे आदी उपस्थित होते.