Homeठाणे-मेट्रोदिव्यात अनधिकृत नळ जोडण्या देणारा आका कोण शोधा...भाजपचे विजय भोईर यांचे ठाणे...

दिव्यात अनधिकृत नळ जोडण्या देणारा आका कोण शोधा…भाजपचे विजय भोईर यांचे ठाणे महापालिकेला आव्हान

दिवा:-गेल्या तीन दिवसात 76 अनधिकृत नळ जोडण्यात तोडल्या…दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शाब्बास… अनेक वर्ष अनधिकृत नळ जोडण्या देणारे आका कोण ? हे ही शोधा अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट करत दिवा भाजपचे नेते व जागा हो दिवेकरचे अध्यक्ष विजय भोईर यांनी अनधिकृत नळ जोडण्या देणाऱ्यांना शोधण्याचे आव्हानच महापालिकेला दिले आहे.

मागील काही दिवसात महापालिकेने अनधिकृत नळ जोडण्याबाबत केलेल्या कारवाईवर बोलताना विजय भोईर यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गेल्या तीन दिवसात सहाय्यक आयुक्त श्री राजेंद्र गिरी यांनी 76 च्या वर अनधिकृत न जोडण्यात तोडल्या. अनेक वर्षांपासून अनधिकृत नळजोडण्या आल्याच कशा?असा प्रश्न या पोस्टमध्ये विजय भोईर यांनी विचारला असून या नळ जोडण्याचा शोध घ्या आणि कारवाई करा असे विजय भोईर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक वर्ष अनधिकृत नळ जोडण्या देणारे आका कोण? याचा शोध महापालिकेने घ्यावा असेही या पोस्टमध्ये विजय भोईर यांनी म्हटले आहे..

error: Content is protected !!