Homeशहर परिसरदिव्यात कमळ फुलवणार, कायापालट करणार !

दिव्यात कमळ फुलवणार, कायापालट करणार !

भाजप ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांचे विजय भोईर आयोजित संवाद मेळाव्यात वक्तव्य

दिवा:- भाजपचे ठाणे सचिव विजय भोईर यांनी दिवा शहरात आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विजय भोईर यांनी नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

सोहळ्यानिमित्त कार्यकर्ता संवाद वारेकर हायस्कूल, दिवा पूर्व येथे आयोजित केला होता. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी या संवाद मेळाव्यात उपस्थित राहून संदीप लेले, नंदू परब,संजय वाघुळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या मेळाव्याच्या माध्यमातून विजय भोईर यांनी संदीप लेले यांच्याकडे मागणी केली की , आम्हाला यावेळी दिव्यात आमचे हक्काचे नगरसेवक हवे आहेत. त्यासाठी आपण ठामपणे आमच्या पाठीशी उभे रहावे.यावेळी सपना भगत, महिला मोर्चा अध्यक्ष यांनी देखील महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.संजय वाघुळे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष कसा वाढवावा, कार्यपद्धती समजावली.
तसेच कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला. समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप लेले यांनी उत्स्फूर्त असे भाषण केले. दिवा शहराशी असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणी यावेळी जागवल्या.आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांना यावेळी शब्द दिला की, अटलजींचे जसे शब्द होते की अंधकार जाऊन कमळ फुलेल, तसेच या दिव्यातही आपण कमळ यावेळी फुलवणारच आणि दिव्याचा कायापालट करणार हा शब्द दिला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. करुणा बांगरगगे आणि श्री. सरचिटणीस समीर चव्हाण यांनी केले होते.
यावेळी मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, गणेश भगत ,रोशन भगत,मधुकर पाटील, अजय सिंग, पंकज सिंग, अशोक गुप्ता, अशोक पाटील, दिलीप भोईर, अंकुश मढवी,सीमा भगत, संगीता भोईर,इत्यादी मान्यवर आणि शेकडो. कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!