दिवा:- भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत आणि भाजपा दिवा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धे’चा बक्षीस समारंभ रविवारी (दिनांक ९ नोव्हेंबर) ग्लोबल स्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला शिवप्रेमी आणि दिव्यातील तमाम जनतेची प्रचंड उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत ‘तिसाई मित्र मंडळ, गणेश पाडा’ यांनी साकारलेल्या ‘अंकाई टंकाई’ किल्ल्याच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:
* प्रथम क्रमांक: तिसाई मित्र मंडळ (किल्ला: अंकाई टंकाई)
* द्वितीय क्रमांक (विभागून): शिवबा राज प्रतिष्ठान (किल्ला: सिंहगड) आणि अचानक मित्र मंडळ (किल्ला: विसापूर कठीणगड)
* तृतीय क्रमांक (विभागून): क्षत्रिय कुलावंतस प्रतिष्ठान (किल्ला: प्रतापगड) आणि नव तरुण मित्र मंडळ (किल्ला: प्रतापगड)
* चतुर्थ क्रमांक (विभागून): गडप्रेमी ग्रुप (किल्ला: तोरणा) आणि काळुबाई बाळ मित्र मंडळ (किल्ला: रायगड)
* पाचवा क्रमांक (विभागून): शिवप्रेरणा ग्रुप (किल्ला: अजिंक्यतारा) आणि गावदेवी चाळ (किल्ला: राजगड)
या भव्य दिव्य बक्षीस समारंभाला ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष श्री. संजय वाघुले, माजी ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री. मनोहर सुखदरे, श्री. विक्रम भोईर, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय भोईर, भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर, श्री. दिलीप भोईर, श्री. अंकुश मढवी, सौ. रेश्मा पवार, श्री. नरेश पवार, श्री. जयदीप भोईर, श्री. श्रीधर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपा महिला मोर्चाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका सौ. करुणा सचिन गगे बांगर यांनी केले. त्यांच्या मनमोहक आणि भारदस्त आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. विजेत्या संघांचे आणि आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






