मुंब्रा:– दिवा-शीळ रोडवरील कार धुण्याच्या सर्विस स्टेशनमध्ये आलेल्या इसमास शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती.या हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या 24 तासात मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती मुंब्रा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
दिव्यातील बी. आर. नगर, टाटा पावर लाईन जवळ आदर्श स्कुल येथे एक इसम झाडी व गवताच्या मध्ये पडला असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. सदर इसमास पुढील उपचारा करीता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्टिपल, कळवा येथे नेले असता, डयुटीवरील डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषीत केले. सदर इरामावर मुंब्रा पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता, सदर इसमास झालेल्या मारहाणी मुळे तो मयत झाले असल्याचे सांगितल्याने, सदर मयत तरुणाची ओळख पटवली असता, तो शोविक गौर श्रीमनी, वय. ३५ वर्षे, राठि. चाक, थलीपारा, कोलकता, राज्य. पश्चिम बंगाल येथील असल्याचे समजले.
या घटनेचा अधिक तपास मुंब्रा पोलिसांनी केला असता, मयत शोविक गौर श्रीमनी हा सुंदर भोईर चायनिज कॉर्नर जवळील कार धुण्याचे सर्व्हिस स्टेशन दिवा शीळ रोड येथे आला असता आकाश भोईर, जितेश भोईर व इतर साथीदारांनी मयतास इथे कशासाठी आला येथुन निघुन जा असे बोलण्यावरून वाद झाला.या कारणावरून त्यांनी मयत यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पहाटे ०५.०० वा. चे सुमारास सदर इसमास सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजभर वय २८ वर्षे यांचे ताब्यात दिले. त्या दोघांनी सदर मयत इसमास एका भाडोत्री ऑटो रिक्षाने आदर्श स्कुलच्या पुढे बौध्द विहार जवळ दिवा येथे घेवुन येऊन मारहाण केली व त्यास बौध्द विहाराच्या बाजुला असलेल्या झाडीमध्ये टाकुन निघुन गेले होते. या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे रा. रूम नंबर २ तिसरा माळा, दुर्गा माता मंदीरा जवळ आसरा अपार्टमेंट दिवा २) रितेश राजेंद्र प्रसाद राजभर क्य २८ वर्षे रा. रूम नंबर १ चाळ नंबर ४ दत्तृपा चाळ, टाटा पॉवर लाईन दिवा याना ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनीच सदर मयत इसमास मारहाण करून फेकुन दिले असल्याचे कबुल केल्याने मुंब्रा पोलीस ठाणे गु. रजि.नं. ॥ १६८०/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, २१७, ३(५) प्रमाणे दिनांक २६/७/२०२४ रोजी गुन्हा नोंद करून सदर गुन्हयात १) सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे २) रितेश राजेंद्र प्रसाद राजभर वय २८ वर्षे ३) आकाश शरद भोईर वय २८ वर्षे, रा. साबेगाव दिवा ४) जितेश भोईर यांना अटक करण्यात आली आहे.
नमुद आरोपीत यांना गुन्हा दाखल केल्यापासुन २४ तासांचे आत तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अटक केली आहे. नमुद गुन्हयाच्या तपासात मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री पाचोरकर, पोलीस निरीक्षक श्री संजय दवणे, सपोनि /कोळेकर, सपोनि / रोहीत केदार सपोनि / तांबे, सपोनि / तोरडमल व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तपास केला आहे.