दिवा:- शहरातील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विकास इंगळे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
विकास इंगळे हे कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असून ते वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून दिव्यातील राजकीय वर्तुळात आहे. त्या पार्श्वभूमीवर विकास इंगळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट ऍड.प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने विकास इंगळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.






