Homeठाणे-मेट्रोदोन सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद ; ईराणी गुन्हेगाराचा समावेश

दोन सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद ; ईराणी गुन्हेगाराचा समावेश

वर्तकनगर पोलिसांची कामगिरी
ठाणे:- ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक जाणाऱ्या ज्येष्ठांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या आंबिवली येथील जाफर युसूफ जाफरी उर्फ चव्हान (२६) या ईराणी गुन्हेगारासह त्याच्या साथीदार संदीप गिरिषचन्द्र प्रसाद (२०) अशा सराईत दुकलीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये चार गुन्हे वर्तकनगरमधील असून उर्वरित चार गुन्हे हे कळवा, चितळसर, खडकपाडा आणि नवघर पोलीस ठाण्यातील आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण १५ गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश आले. याशिवाय त्या दोघांकडून चोरीला गेलेल्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि दोन दुचाकी असा ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सद्यस्थितीत ते दोघे न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती सह्ययक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यशोधननगर येथील फिर्यादी वंदना माने या १२ मार्च रोजी तमन्ना बिल्डींगच्या पासुन आई माता चौकच्या दिशेने मॉर्निंग वॉकला जात असताना, अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरी चोरी केली. याचदरम्यान त्यांनी चोरट्यांचा हात धरून विरोध केला असता, त्या दोघांनी त्यांना ढकलुन खाली पाडले आणि जबरीने चैन खेचुन धूम ठोकली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकाने ज्या ठिकाणी घटना घडली. त्या परिसराचा बारकाईने तपास केल्या. तेथुन चोरटे चितळसर, कापुरबावडी, खारेगाव टोलनाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेला असल्याची खात्री झाली. त्यानुसार सापळा रचुन त्यांना पळुन जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्या दोघांकडुन सदर गुन्हयातील तसेच इतर गुन्हयातील जबरी चोरी केलेला एकुण ३ लाख ९० हजार २४० रूपये किमतीचे ६ तोळे, ४ ग्रॅम, ७४ मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैन व मंगळसुत्र हस्तगत केले तसेच १ लाख २० हजारांच्या दोन मोटारसायकल व १५ हजारांचे दोन मोबाईल फोन असा एकुण ५ लाख २५ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच एकूण १४ जबरी चोरीचे तर एक शरीर विरुद्धचा गुन्हा असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. त्या दोघांना २ एप्रिल रोजी अटक केले असून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांना इतर गुन्ह्यात ताब्यात घेतले जाईल. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जावळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!