Homeठाणे-मेट्रोप्रभाग 28 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे भव्य रॅली काढून...

प्रभाग 28 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन

दिवा:- दिवा शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग 28 चे उमेदवार ज्योती पाटील,ॲड.रोहिदास मुंडे, योगेश निकम यांनी भव्य रॅली काढून शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ज्योती पाटील,रोहिदास मुंडे व योगेश निकम यांनी मागील काही दिवसात प्रचाराचे रान पेटवून दिवा शहरातील विविध प्रश्नांवर मतदारांना भेटून आपला प्रचार केला आहे. दिवा शहराचे विकासाचे व्हिजन त्यांना मांडले आहे. त्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांनी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. संपूर्ण प्रभाग 28 मध्ये ही रॅली काढण्यात आली.

error: Content is protected !!