Homeठाणे-मेट्रोभाजपा दिवा शहर महिला मोर्चा दिव्यातील विजयाचे शिल्पकार ठरणार-मृणाल पेंडसे

भाजपा दिवा शहर महिला मोर्चा दिव्यातील विजयाचे शिल्पकार ठरणार-मृणाल पेंडसे

दिवा:- दिवा शहरातील भाजपची जम्बो महिला आघाडी कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी दिव्यातील महिला आघाडीचे कौतुक केले.भाजपा दिवा शहर महिला मोर्चा दिव्यातील विजयाचे शिल्पकार ठरणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार व ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे, ठाणे शहर सरचिटणीस कैलास म्हात्रे दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या उपस्थितीत दिवा महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांच्या माध्यमातून दिवा भाजप महिला मोर्चा पदनियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी दिवा महिला मोर्च्या सरचिटणीस सौ.सुहासिनी गुळेकर,सरचिटणीस सौ.साधना सिंग,उपाध्यक्ष सौ.अमीता तांबे, उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुनीता प्रजापती, अनुसूचित जाती महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सोनाळी वीर, युवती मोर्चा कु. विनीता महेश दांडेकर आदी महिलांची पदनियुक्ती जाहीर करण्यात आली.दिवा शहरात ज्योती पाटील या भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून काम पाहत असून एक आक्रमक महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
ज्योती पाटील यांच्या कामाने प्रभावित होऊन अनेक महिला प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत आणि ही महिलांची ताकदच उद्या भाजपचे नगरसेवक निवडून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल असे ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष मृणाल पेंडसे यावेळी बोलताना म्हणाल्या .

error: Content is protected !!