Homeकोकण-महाराष्ट्रमहायुती भक्कमच;आम्ही १०० जागा जिंकणार!पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दावा

महायुती भक्कमच;आम्ही १०० जागा जिंकणार!पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दावा

ठाणे: आमच्या संख्या बळावरून कोणताच वाद नाही. शिंदे – फडणवीस आणि पवार हे तिघे जागा वाटपाचा जो निर्णय घेणार आहेत. तो आम्हाला मान असेल.तसेच महायुती भक्कम असून हेच महायुतीचे ट्रिपल इंजिन बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहे. तो वेग कमी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी तो वेग कमी होणार नाही. शिवाय लोकसभेला महायुतीचे आणि मित्र पक्षाचे ४५ अधिक खासदार आणि विधानसभेला २२५ अधिक आमदार येतील. त्यातच विधानसभेला आम्ही १०० जागा जिंकणार असल्याचा दावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी ठाण्यात केला.
       शनिवारी पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती व त्यावरील उपाययोजना याविषयीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, देसाई यांनी वरील दावा केला आहे. त्यावेळी अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारल्यावर त्यांच्या एका वक्तव्याने महायुती काही होईल असे बिलकुल वाटत नाही. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी ४ -४ अशा १२ नेत्यांची गेल्या मंगळवारी समन्वयक बैठक पार पडली आहे. त्यावेळी महायुतीत कोणतेही मतभेद होऊ द्यावयाचे नाही असा निर्णय झाला आहे. तर, महायुती भक्कमच आहे .असे ते शेवटी म्हणाले. 

error: Content is protected !!