Homeठाणे-मेट्रोमाजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

दिवा:-दिवा शिवसेनेचे उपशहरप्रमुख, माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी आज वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शैलेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली .यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शैलेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.शैलेश पाटील दरवर्षी वाढदिवसानिमित्त सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत असतात.या वर्षीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी शैलेश पाटील यांच्या सोबत विभाग प्रमुख भालचंद्र भगत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!