Homeशहर परिसरमुंब्रादेवी कॉलनीत पाणी पुरवठा सबलाईनच्या कामाला सुरुवात;आ.राजू पाटील यांचा पाठपुरावा

मुंब्रादेवी कॉलनीत पाणी पुरवठा सबलाईनच्या कामाला सुरुवात;आ.राजू पाटील यांचा पाठपुरावा

दिवा:- मनसेच्या प्रयत्नाने मुंब्रा देवी कॉलनी परिसरात पाण्याच्या सबलाईनचे काम सुरू झाले आहे.
दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथे साई ईश्वर पार्क , रॉयल रेसिडेन्सी या परिसरातील इमारतींना गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणी पुरवठा होत होता. ज्या सबलाईन वरून या परिसरातील इमारतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले होते, त्या सबलाईनवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कनेक्शन वाढल्यामुळे अधिकृत नळ जोडणी असणाऱ्या रहिवाशांना पाणी मिळत नव्हते. बिल भरूनही पाणी मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती.

याबाबतची लेखी तक्रार तेथील रहिवाशांनी दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांजवळ केल्या नंतर दिवा मनसे कडून स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या माध्यमातून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुरेश वाघिरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर आज या नवीन सबलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी दिवा मनसेने पाणी पुरवठा विभागाचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!