Homeठाणे-मेट्रोमुंब्र्यातील अपार्टमेंटमध्ये आग, मीटर रूमच्या जवळ उभ्या असलेल्या दोन दुचाकी जळून खाक

मुंब्र्यातील अपार्टमेंटमध्ये आग, मीटर रूमच्या जवळ उभ्या असलेल्या दोन दुचाकी जळून खाक

ठाणे, मुंब्रा :- अमृतनगर येथील पूजा अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सकाळी इलेक्ट्रिक केबलला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी मीटर रूमच्या जवळ उभ्या असलेल्या दोन दुचाकी सापडल्या, ज्यामुळे त्या जळून खाक झाल्या आहेत.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूजा अपार्टमेंटच्या मीटर रूममधील इलेक्ट्रिक केबलने अचानक पेट घेतला. दक्ष नागरिक साईनाथ भालेराव यांनी तातडीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दानिश खान आणि साकीर यांच्या मालकीच्या दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

error: Content is protected !!